*कोकण Express*
*वाढत्या पेट्रोल व डिझेल दरवाढीचा वैभववाडी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला निषेध*
*वाढत्या पेट्रोल व डिझेल दरवाढीचा वैभववाडी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला निषेध*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
केंद्र सरकार कडून करण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेल तसेच घरकुल गॅस दरात दिवसंदिवस वाढ होत आहे ह्याचा त्रास सामान्य माणसाला होत आहे. सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम हे केंद्र सरकार करत आहे. तसेच सामान्य माणूस ह्यात भरडला जातोय. ह्याचाच निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैभववाडीतर्फे पेट्रोल पंपावर निषेध करण्यात आला व नायब तहसीलदार श्री. नाईक यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत व तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष बबन धुरी, शहराध्यक्ष वैभव रावराणे, संजय गांधी निराधार समिती सदस्य संकेत सावंत, दक्षता कमिटी सदस्य रमेश मोफेरकर, नंदू पवार, शिवाजी सावंत, अमोल आमकर, सुशांत सावंत, निलेश परब, केशव रावराणे, अरुण सरवणकर, इम्रान शेख, संतोष पाटील, संदेश शिंदे, रोहेश सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.