*कोकण Express*
*संजय गांधी निराधार योजनेची सावंतवाडीत १०३ प्रकरणे मंजूर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या काल दिनांक २ जुलै रोजी झालेल्या बैठकी मध्ये लाभार्थ्यांची १०३ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष श्री अशोक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी आयोजित बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत ६३ प्रकरणे, इंदिरा गांधी योजनेअंतर्गत ४ प्रकरणे, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत १ प्रकरण, संजय गांधी योजनेअंतर्गत २१ प्रकरण तर इंदिरा गांधी योजनेअंतर्गत ( राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन भाग अ) १४ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. यावेळी समितीचे सचिव तहसीलदार राजाराम म्हात्रे, समितीचे सदस्य गजानन नाटेकर, नारायण राणे, भारती मोरे, उदय पारिपत्ते, अजित नातू , अनिल जाधव, सावंतवाडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुचित येरवलकर, सावंतवाडी नगरपालिकेच्या प्रतिनिधी आसावरी केळबायकर, संजय गांधी योजना कार्यालय अव्वल कारकून डी. व्ही मेस्त्री आदी उपस्थित होते.