*कोकण Express*
*मुंबई-गोवा महामार्गासाठी दोनशे अठरा कोटी रुपयाचा निधी मंजूर…*
*खासदारांच्या पाठपुराव्याला यश;झाराप पत्रादेवीच्या सुशोभिकरणासाठी तीन कोटी होणार खर्च…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
मुंबई-गोवा महामार्गासाठी केद्रींय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांनी दोनशे अठरा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे.त्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे आता या महामार्गाचे काम आणखी जलद गतीने होणार आहे.दरम्यान झाराप-पत्रादेवी या महामार्गाच्या टप्प्यासाठी तीन कोटी रुपये वेगळे मंजूर करण्यात आले आहेत.यात या टप्प्यासाठी सुरक्षा विषयक योजना करण्याबरोबर रंगरंगोटी आणि झाडे लावण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे. याबाबतची माहीती शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब यांनी दिली आहे.