फोंडाघाट महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन साजरा

फोंडाघाट महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन साजरा

*कोकण  Express*

*फोंडाघाट महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन साजरा*

*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटचा जिमखाना विभाग व तालुका विधी सेवा समिती कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त मा. डी. के. पाटील सहदिवाणी न्यायाधीश कणकवली यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या विषयी विचार मांडताना त्यांनी अंमली पदार्थ व त्याची तस्करी याविषयी माहिती देऊन त्याच्या प्रतिबंधासाठी असणारे सर्व कायदे त्यांनी सविस्तर सांगितले.

अंमली पदार्थांमुळे होणारे सर्वंकष नुकसान विशद करताना त्यांनी युवापिढीने यापासून सावध राहिले पाहिजे असेही आवाहन केले. अंमली पदार्थांच्या सेवनाने वैयक्तिक, कौटुंबिक नुकसान तर होतेच त्याच बरोबर युवा शक्तीचा ऱ्हास झाल्याने देशाचेही फार मोठे नुकसान होते. युवापिढीच्या हातात देश बदलण्याची ताकत असते. तीच जर लयाला गेली तर देशाचे भवितव्य अंधारमय असते. त्यामुळे अंमली पदार्थापासून आपण सावध राहिले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. सदर व्याख्यानाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांच्यासह जिमखाना विभाग प्रमुख प्रा. जगदीश राणे, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या व्याख्यानाला सुमारे 57 श्रोते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!