*कोकण Express*
*▪️दादा लढवय्ये, लवकर बरे व्हा सिंधुदुर्ग राष्ट्रवादी नेते आणि कणकवली नगरसेवक अबिद नाईक यांच्या कडून अजित पवारांना सदिच्छा…….*
*▪️महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्या बळावर कोरोना आजाराला पराभूत करून लवकर च सर्वांच्या सोबत येतील.*
*कणकवली ः प्रतिनिधी*
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून मुंबईतील ब्रीच कॅण्डी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर दादा लवकर बरे व्हा, अशा सदिच्छा त्यांच्या अनेक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे राष्ट्रवादी पक्षाचे आधारस्तंभ आदरणीय अजित दादा पवार साहेब यांच्या पाठीशी राज्यातील गोर गरीब थोर मोठ्या जनतेचे आशीर्वाद आहेत त्यामुळे आदरणीय अजित दादा लवकर बरे होउन महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी मंत्रालयात येतील व दादा लवकरात लवकर बरे व्हावे हि परमेश्वर चरणी प्रार्थना
राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, असेही त्यांनी सांगितले.