*कोकण Express*
*माजी आम. प्रमोद जठार यांचे वैश्यवाणी समाजाच्या ओबिसी दाखल्याच्या प्रश्नांबाबात उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन*
*वैश्यवाणी समाजाला येणाऱ्या ओबिसी दाखल्यातील अडचणी दूर करून समाजाला न्याय मिळवून द्यावा*
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश*
*मुंबई*
वैश्यवाणी समाजाच्या ओबीसी दाखले मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दि. २९ जून, २०२१ रोजी माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली वैश्यवाणी ओबीसी कृती समिती अध्यक्ष सुनील खाड्ये, सचिव विकास संसारे यांनी निवदेन दिले. त्यावर अजित पवार यांनी तातडीने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, प्रधान सचिव ओबीसी मंत्रालय, सबंधित विभागाचे अधिकारी, माजी आमदार प्रमोद जठार, वैश्यवाणी ओबीसी कृती समिती अध्यक्ष व सचिव यांची संयुक्त सभा घेतली.
या सभेत वैश्यवाणी समाजाला ओबीसी दाखले मिळण्यासाठी येणारा अडचणीबाबत सखोल चर्चा झाल्यानंतर वैश्यवाणी हिंदू -वैश्य, हिंदू -वाणी असे शाळेच्या दाखल्यावर नमूद असलेल्या लोकांना ओबीसी दाखले मिळण्यासाठी राज्यमागास आयोग यांच्याकडे परत प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करावा आणि वैश्यवाणी समाजाला न्याय द्यावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.