*कोकण Express*
*▪️विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सिंधुदुर्गमधील अतिवृष्टीबाधित भागांची केली पाहणी*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील उध्वस्त झालेल्या नुकसानग्रस्त भागांचा सलग पाच दिवसांचा झंझावती दौरा केल्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर रायगड, रत्नागिरी जिल्ह्याच्या दौ-यानंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी भागांचा दौरा केला. आज आपल्या दौ-यात दरेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कणकवली तालुक्यातील वाघदे ,ओसरगाव आणि सावंतवाडी तालुक्यातील पावशी या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली त्यावेळी सोबत आमदार नितेश राणे , आमदार प्रसाद लाड जिल्हा अध्यक्ष राजन तेली सोबत होते.
पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. बहुतेक भागात जिवितहानी झाली असून जनावरेही दगावली आहेत घरांचेही नुकसान झाले आहे. बंधारे, कालवे याचीही नासधुस झाली आहे. त्यामुळे पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकरी, ग्रामस्थ यांना प्रविण दरेकर यांनी धीर दिला. सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीबाधित शेतक-यांना राज्य सरकारने दिलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे, त्यामुळे कोकणासाठी विशेष पॅकेज मिळवून देण्यासाठी आग्रह धरणार असल्याचेही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित गावांचा दौरा केल्यानंतर दरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांसमवेत बैठक घेतली व या बैठकीत अतिवृष्टी बाधित भागांच्या पंचनाम्याची सद्यस्थिती तसेच शेतक-यांनी मिळणा-या मदतीचा आढावा घेतला. शेतक-यांना जास्तीत जास्त मदत देण्याच्या दृष्टीने दरेकर यांनी या बैठकीत काही सूचना मांडल्या.
——————————————————————-