खासगी कोविड सेंटर डॉक्टरांकडून होणारी लूट थांबण्यासाठी मनसेचे घंटानाद आंदोलन

खासगी कोविड सेंटर डॉक्टरांकडून होणारी लूट थांबण्यासाठी मनसेचे घंटानाद आंदोलन

*कोकण Express*

*खासगी कोविड सेंटर डॉक्टरांकडून होणारी लूट थांबण्यासाठी मनसेचे घंटानाद आंदोलन*

*जनतेच्या प्रश्नांसाठी मनसे आवाज उठवत राहणार**कणकवली ः संंजना हळदिवे*

कोरोना रुग्णांची आर्थिक लूटमार थांबवा…खाजगी कोव्हीड केअर सेंटरच्या डॉक्टरांकडून रुग्णांची लूटमार थांबवा..महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा कोरोना रुग्णांना लाभ द्या…आदी मागण्यांसाठी मनसेच्या वतीने कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. या नेत्यांचे करायचे काय..खाली डोकं वर पाय…पालकमंत्री हाय हाय..अशा घोषणांनी मनसेने प्रांताधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.त्यानंतर प्रभारी प्रांताधिकारी वर्षा सिघन यांच्याशी मागण्यांच्या मुद्यांवर चर्चेच्यावेळी प्रांत व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.यावेळी जनतेच्या प्रश्नांसाठी मनसे आवाज उठवत राहणार असल्याचा इशारा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला. यावेळी तहसीलदार रमेश पवार,पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला,शिरेस्तेदार श्री.नाईक आदी अधिकारी उपस्थित होते.तर मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, चंदन मेस्त्री, सुनील सोनार, संतोष कुडाळकर, अनंत आचरेकर, दत्ताराम अमृते, महेश नलावडे, राजू बिडवाडकर ,प्रशांत उपरकर आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत. मनसेच्यावतीने जन आरोग्य योजनेचा लाभ सिंधुदुर्गात कोरोना रुग्णांना मिळत नाही. खाजगी कोव्हीड केअर सेंटकडून शासकीय दराची अंमलबजावणी अद्याप केली जात नाही आहे आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन ३ जून रोजी कणकवली प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र त्याबाबत दखल घेतली नसल्याने मनसेच्यावतीने आज घंटानाद आंदोलन छेडण्यात आले आहे. यावेळी प्रांताधिकारी यांनी तालुका समितीने तपासणी प्रमाणे ६ रुग्णांना पैसे परत देण्याचे त्या खासगी कोविड सेंटरला दिल्याची सांगितले. तसेच आपल्या मागण्यांबाबत कारवाई करण्यात येईल.असे आश्वासन दिलं आहे.मात्र, चर्चे दरम्यान श्री. उपरकर यांच्या मुद्द्यांवर चुकीचे उत्तर देण्याचा प्रयत्न प्रांताधिकारी श्रीमती सिघन यांनी केल्याने माजी आमदार यांनी संतप्त होत आमच्या मागण्या ह्या जनतेच्या मागण्या आहेत, जोपर्यंत कारवाई होत नाही,तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, जिल्हाधिकारी कार्यालसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी माजी आम.परशुराम उपरकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!