*कोकण Express*
*▪️समाजभिमुख कार्य करणा-या ‘नवदुर्गा युवा मंडळा’ च्या सदैव पाठिशी राहणार*
*▪️कणकवली पोलीस निरिक्षक श्री. शिवाजीराव कोळी साहेब यांची “कोवीड योध्दा” सम्मान कार्यक्रमात ग्वाही*
नवीन कुर्ली येथील ‘नवदुर्गा युवा मंडळ’ आयोजीत सार्वजनिक नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमाचं गत वर्षी देखिल निमंत्रण होतं नियोजन प्रमाणे कार्यक्रमाला येणार असताना अचानक तालुक्यामध्ये दुस-या ठिकाणी कामानिम्मत जावं लागलं. पण यावर्षी कार्यक्रमाचं निमंत्रण जरी नसतं तरी देवीच्या दर्शनाला धावती भेट देणार होतो कारण नवीन कुर्ली मध्ये काय घडतयं नि काय दर्शविलं जातयं हे बारकाईने बघायचं होतं. पण ‘नवदुर्गा युवा मंडळा’ कडुन यावर्षीही निमंत्रण आलं नि तेव्हाचं निमंत्रकांना शब्द दिला होता कि कार्यक्रमाला येणार आणि त्याप्रमाणे कार्यक्रमाला येणं झालं.
येथे आल्यानंतर येथील हे भक्तीमय वातावरण गावक-यांनी केलेलं स्वागत,नवदुर्गा युवा मंडळाचं सामाजिक कार्य आणि गावातील लोकांची एकजुट पाहुन भारावुनचं गेलो. माझ्या प्रशासकीय सेवेच्या कालावधीमध्ये ब-याच ठिकाणी विविध कार्यक्रमांना जाण्याचा योग येतो. ब-याच ठिकाणी पहायला मिळतयं मंडळे उदयास येतात २/४ वर्ष काम करतात व कुठल्या कुठे गायब होतात पण ‘नवदुर्गा युवा मंडळ’ गेली १८ वर्षे सातत्यपुर्ण नवरात्र उत्सवाचं आयोजन करुन देवीचा उपास,नामस्मरण,भजन,किर्तन यापलिकडेही जावुन सांस्कृतिक,सामाजिक,शैक्षणिक उपक्रम राबवुन समाजामध्ये आपण कुठे तरी समाजाचे जबाबदार घटक असुन सामाजिक बांधिलकी जोपासतात याचा खुप आनंद वाटला,या मंडळाचा उदयचं मुळामध्ये देवी दुर्गामातेच्या उत्सवाचा हेतु व उदि्दष्टे समोर ठेवुन झाल्याने ह्या मंडळाचं काम/कार्य कदापिही संपणारं नाही,त्यामुळे यापुढे सामाजभिमुख काम असताना युवा मंडळाला प्रशासन पातळीवर कोणतेही सहकार्य लागल्यास माझं नेहमीच सहकार्य राहील.
कोरोना महामारीमध्ये संपुर्ण जगामध्ये लॉकडाऊन असताना ‘नवदुर्गा युवा मंडळा’ कडुन लॉकडाऊन कालावधीत जीवनाश्यक वस्तुकरीता भाजीपाला सेवा केंद्र सुरु होते,तसेच नागरिकांच्या आरोग्या बाबतही मंडळाच्या स्वयंसेवकांकडुन औषधे घरपोच केली जात होती,रोगप्रतिकारक अर्सेनिक अल्बम- ३० सारख्या गोळ्याचे वाटप असो. तसेच लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेल्या लोकांना धान्य वाटपाचा उपक्रम असो किंवा गावामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत नसताना युवा मंडळाने मुंबई व इतर बाहेर गावातुन आलेल्या आपल्याचं गावातील लोकांचे क्वॉरंटाईन बाबतीत केलेले नियोजन असो. निश्चितचं कौतुकास्पद आहे. माणसातला माणुसकी दाखवणारे उपक्रम राबवुन “नवदुर्गा युवा मंडळा”ने गावामध्येचं नव्हे तर सर्वत्र एक आदर्श निर्माण केला आहे. कणकवली ठाण्याचा पोलीस निरिक्षक असल्याने सर्व बाबीकडे लक्ष असतो मध्यंतरीच्या कालावधीमध्ये नवीन कुर्ली गावामध्ये काहींनी वातावरण दुषित करण्याचं काम केलं पण त्यांनाही कायद्याच्या चौकटीत राहुन योग्य तो धडा शिकवला आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये गावाने जी एकजुट दाखवली त्याचं प्रकारची एकजुट कायम असणे गरजेचं आहे. आज या ठिकाणी देवीच्या दर्शनाला बोलावुन माझा ही “कोवीड योध्दा” म्हणुन जो सत्कार करुन मानसम्मान केला आहे त्याबद्दल मी नेहमीच आभारी राहिन. तसेच यापुढे समाजभिमुख कार्य करणा-या ‘नवदुर्गा युवा मंडळा’च्या सदैव पाठिशी राहणार असल्याची ग्वाही देतो.
यावेळी “नवदुर्गा युवा मंडळ” व “नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ” यांसकडुन सम्मा. शिवाजीराव कोळी साहेब यांचा शाल,श्रीफळ,कोवीड योध्दा- सम्मानपत्र,सम्मानचिन्न व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला,यावेळी ‘नवदुर्गा युवा मंडळा’चे उपाध्यक्ष सम्मा. श्री. दिपक शिंदे,खजिनदार प्रदिप आग्रे,सल्लागार अरुणोदय पिळणकर,मंगेश मडवी,अमित दळवी,सचिन परब,सचिन साळसकर,विजय आग्रे आदी तर ‘नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळा’चे अध्यक्ष सम्मा. श्री. राजेंद्र कोलते,उपाध्यक्ष तथा कुर्ली ग्रामपंचायत सदस्य श्री. सुरज तावडे,सचिव धिरज हुंबे,रवींद्र नवाळे,कृष्णा परब,प्रकाश दळवी,चंद्रकांत तेली,विजय परब आदी ग्रामस्थ व युवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. रवींद्र नवाळे तर आभार श्री. धीरज हुंबे यांनी मानले.