*कोकण Express*
*देवबाग गावामध्ये श्री. देव महापुरुष मंदिर येथे मोफत सोलर लाईटचे लोकार्पण*
*मालवण ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गचे सुपुत्र श्री. गणेशजी कदम (महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेना अध्यक्ष )यांचा पुढाकार. देवबाग गावाच्या वतीने गावातील मानकरी श्री. आबा कुर्ले यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थ तसेच श्री. पास्कोल रॉड्रिग्ज, श्री. अल्बर्ट रॉड्रिग्ज, हिरोचंद केळुस्कर, अमोल कुबल, सायबा केळुस्कर, दाजी ढोलये, बाळा राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.. गावाकऱ्यांनी श्री. गणेशजी कदम यांचे आभार व्यक्त करीत त्यांच्या कुटुंबासाठी तसेच व्यवसायासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी श्री. देव महापुरुष चरणी प्रार्थना करण्यात आली…. आता पर्यंत ही सहावी सोलर लाईट असून श्री. गणेशजी कदम यांनी देवबाग गावासाठी मोफत स्वरूपात दिल्या आहेत…