*कोकण Express*
*डॉ.शरद पाटील,यांना कोरोना योध्दा सन्मानित..*
*श्रीवास क्लिनिकल लॅब (माणगाव)चा पुढाकार..*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
गेली दीड वर्षे कोरोना काळात अविरतपणे, अहोरात्र रुग्णांना सेवा बजावत काम करणाऱ्या माणगाव खोऱ्यातील डॉक्टर शरद पाटील यांच्या कामाची दखल घेत श्रीवास क्लीनिकल लॅब (माणगाव) च्या पुढाकारातून कोरोना योद्धा सन्मानित करण्यात आले.
यावेळी ॲड.मोहन पाटणेकर, जिल्हा सरचिटणीस राकेश केसरकर,महीला अध्यक्ष महीला सेल सिंधुदुर्ग सौ.दर्शना केसरकर, मिलिंद धुरी,बाळा कोरगांवकर, अमित देसाई, पांडुरंग खरात,संजय परब उपस्थित होते.