_*मोठी बातमी! कर्जदारांना चक्रवाढ व्याज मिळणार परत*_

 _*मोठी बातमी! कर्जदारांना चक्रवाढ व्याज मिळणार परत*_

  1. *आर्थिक*

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) काळातील व्याज रकमेवरील चक्रव्याढ व्याज रकमेत सूट देण्याचा आदेश दिला असून यासंबंधीची नियमावली जाहीर केली आहे.

*यांना होणार फायदा*

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या या निर्णयाचा फायदा दोन कोटींपर्यंतचं कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना मिळणार आहे.

आदेशानुसार, दोन कोटींचं कर्ज असणारे कर्जदार ज्यांनी मार्च ते ऑगस्ट असे सहा महिने मोरॅटोरियम सुविधा घेतली होती त्यांची चक्रव्याढ व्याज रक्कम परत केली जाणार आहे.

अर्थ मंत्रालयाच्या निर्णयाचा फायदा लघू, लघू व मध्यम, शैक्षणिक, गृह, क्रेडिट कार्ड, ऑटोमोबाइल, वैयक्तिक, व्यवसायिक कर्जदारांना होणार आहे.

*खात्यात जमा होणार रक्कम*

ही रक्कम ५ नोव्हेंबरला किंवा त्याच्या आधी कर्जदाराच्या खात्यात जमा करावी लागणार आहे.

यानंतर बँका १२ डिसेंबपर्यंत सरकारकडे परतफेडीसाठी दावा करु शकतात.

या निर्णयामुळे केंद्राला ६५०० कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!