आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन सहकार्य करावे

आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन सहकार्य करावे

*कोकण Express*

*आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन सहकार्य करावे…!*

*डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर कणकवली परबवाडीतील नागरिकांचे आवाहन…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवलीत सापडलेला डेल्टा प्लस रुग्ण सद्यस्थितीत आपल्या घरातच असून त्याला सध्यास्थितीत कोणताही आजार नसल्याचे समजते. त्यामुळे कणकवली येथील परबवाडी रहिवासीनी घाबरून न जाता आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन रहिवाशांना सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक रहिवाशी दादा परब, भीवा परब, बबलू परब, शैलेश परब यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात परबवाडी येथे मिळालेला डेल्टा प्लस चा रुग्ण हा जिल्ह्यातील पहिला डेल्टा प्लसचा रुग्ण असल्याचे पुढे येत आहे. पण सध्या या रुग्णाला कुठल्याही प्रकारचा आजार नसून तो कोरोना मुक्त होऊन बरेच दिवस झालेचे समजत आहे. तसेच त्याच्या रक्ताचे नमुने बरेच दिवसापूर्वी तपासणी साठी पाठवले होते. त्याचा अहवाल या दोन दिवसात प्राप्त झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या डेल्टा प्लस रुग्ण आपल्या घरातच असून त्याला सध्यास्थितीत कोणताही आजार नसल्याचे समजूत आहे.

हा रुग्ण स्थानिक परबवाडी मधील नसून परबवाडी पासून बऱ्याच अंतरावर नवीन वसाहती येथील इमारती मधला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन उपायोजना करावी तसेच परबवाडी मधील स्थानिक रहिवाशी हे आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत, जसं की मास्क लावणे सॅनिटायजर वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे यासारखे उपायोजना स्थानिक नागरिक करत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलाच मिळालेला रुग्ण हा कणकवली शहरातील परबवाडी येथे असल्याने वृत्त परबवाडीतील स्थानिक रहिवासींना समजतात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होत, यासाठी स्थानिक रहिवाशी दादा परब, भीवा परब, बबलू परब, शैलेश परब यांनी परबवाडी रहिवासीनी घाबरून न जाता आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन रहिवाशांना सहकार्य करावे, असे परबवाडीतील स्थानिक रहिवाशांनी यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!