*कोकण Express*
◾ *राज्य सरकारचा मोठा निर्णय ! – ९० टक्के गुण घेणाऱ्या, विद्यार्थ्यांना मिळणार मोठे अनुदान*
◾ अनुसूचित जातीतील – 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली
◾ *काय म्हणाले धनंजय मुंडे ?*
🔰 सामाजिक न्याय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार – अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी – 11 वी व 12 वी
🔰 या दोन वर्षात, प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्यात येतील
🔰 या योजनेचा लाभ घेण्यासाठी, विद्यार्थ्यांनी 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त करणे आणि त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न – 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे
🔰 त्याचप्रमाणे MH-CET, JEE, NEET यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्वतयारीसाठी याचा फायदा होणार, दरम्यान – याविषयी आणखी काही अपडेट आले तर, आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहचवू
📢 *राज्य सरकारचा निर्णय* – प्रत्येक विध्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाचा आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील शेअर करा.