*कोकण Express*
*भाजप कार्यकर्त्यांचे योगदान इतरांसाठी मार्गदर्शक! आमदार आशिष शेलार*
*चिंदर विलगिकरण कक्षाला आमदार आशिष शेलार यांची भेट*
*मालवण ः प्रतिनिधी*
कोरोना काळात ग्रामस्थांच्या तब्येतीची चांगली काळजी भाजपच्या माध्यमातून आपण सर्व जण घेत आहात. त्यामुळे सर्वांनि स्वतःची काळजी घेत अशीच समाजसेवा यापुढे चालू ठेवूया असे प्रतिपादन भाजप आमदार आशिष शेलार यांनी येथे केले.
चिंदर येथील ग्राम विलगिकरण कक्षाला भाजप आमदार आशिष शेलार यांनी भेट देत विलगिकरण कक्षातील रुग्णांची चौकशी केली. चिंदर सरपंच सौ.राजश्री कोदे व उपसरपंच दिपक सुर्वे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्तानं आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते कल्पवृक्ष रोपांची लागवड करण्यात आली आणि पंचक्रोशितील सरपंचाना आँक्सीमिटर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजु परुळेकर, भाजप नेते अतुल काळसेकर, भाजप तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर, अशोक सावंत, प्रभाकर सावंत, विलास हडकर, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, संतोष कोदे, प्रकाश मेस्री, बाबा परब, दत्ता वराडकर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर,जानवी घाडी, सानिका चिंदरकर,रिया घागरे, पोलिस पाटिल पाताडे,दिगंबर जाधव, सिध्देश नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोरोना वर यशस्वी मात करुन दहा दिवसाचा अवधी पूर्ण केलेल्या दहा रुग्णांना गुलाब पुष्प देत शुभेच्छा देण्यात आल्या.