*कोकण Express*
*शिवसेनेचा “त्या” विकासकामांच्या दर्जावर असणार वॉच*
*दर्जाहीन काम केल्यास ठेकेदाराला एकही रुपया मिळू देणार नसल्याचा इशारा*
*वैभववाडी शहरप्रमुख प्रदीप रावराणे यांचा इशारा*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी शहरातील विकासकामांसाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी 1 कोटी 70 लाख 71 हजार 853 रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. शिवसेना खाजगी सिव्हिल इंजिनिअर नेमून या विकासकामांच्या दर्जावर देखरेख ठेवणार आहे. दर्जाहीन काम केल्यास ठेकेदाराला एकही रुपया मिळू देणार नसल्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख प्रदीप रावराणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.
पालकमंत्र्यांनी दिलेल्या विकासनिधीतील 9 विकासकामांच्या निविदेला मंजुरी मिळाली आहे. सदर निधी मंजूर होण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, शिवसैनिकांच्या पाठपुराव्यानंतर खासदार विनायक राऊत यांच्या मागणीनुसार पालकमंत्री उदय सामंत यांनी हा निधी दिला असून जनतेला अपेक्षित असणारे दर्जेदार काम होणे गरजेचे आहे. या कामाच्या दर्जात तडजोड करून भ्रष्टाचार केल्यास ठेकेदाराला 1 रुपयाही मिळू देणार नसल्याचा इशारा प्रदीप रावराणे यांनी दिला आहे.