*कोकण Express*
*“डेल्टाप्लस” चा रुग्ण tल नागरिकांच्या “स्वॅब टेस्ट” घेण्यास सुरुवात…*
शहरात “डेल्टा प्लस”चा पहिला रुग्ण आढळला त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.या पार्श्वभूमीवर रुग्ण मिळालेल्या परिसरात आज नागरिकांची “स्वॅब टेस्ट” घेण्यास सुरूवात करण्यात आली.दरम्यान नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.यावेळी कोणीही घाबरून जाऊ नये,आवश्यक असलेले नियम पाळावे, परिसरात स्वच्छतेकडे लक्ष द्यावेत,अशा सूचनाही त्यांनी नागरिकांना दिल्या.
या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नगरपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या मदतीने त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे.
यावेळी यावेळी तालुका आरोग्य अधिकारी संजय पोळ, डॉक्टर चौगुले, नगराध्यक्ष समीर नलावडे ,नगरसेवक संजय कामतेकर, वग रहिवासी डॉक्टर चंद्रकांत पुरळकर,रमेश झेमणे ,अशोकआचरेकर,प्रवीण सावंत,दीक्षा पुरळकर, उपस्थित होते.