सांगवे- कनेडी भा ज प कार्यालयात आमदार श्री नितेश राणे यांचा वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम संपन्न

सांगवे- कनेडी भा ज प कार्यालयात आमदार श्री नितेश राणे यांचा वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम संपन्न

*कोकण  Express*

*सांगवे- कनेडी भा ज प कार्यालयात आमदार श्री नितेश राणे यांचा वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम संपन्न*

*कणकवली ः ( संजना हळदिवे)*

दिनांक २३ जून २०२१ रोजी आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवे कनेडी बाजारपेठेतील भा ज प विभागीय कार्यालय येथे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ . संजना संदेश सावंत व माजी जिल्हा परीषद अध्यक्ष श्री संदेश ( गोट्या) सावंत यांच्या मार्फत मोफत काजू कलमे, छत्री व जिलेबी वाटप चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वेळी नाटळ सांगवे पंचक्रोशितील ग्रामस्थांना गरजे प्रमाणे २५०० काजू रोपांचे वाटप करण्यात आले तसेच ४००० छत्री वाटप उपक्रमाची प्रातिनिधिक सुरवात करण्यात आली येत्या काही दिवसात नाटळ- सांगवे पंचक्रोशितील ग्रामस्थांना या छत्र्या प्रत्येक घरात घरपोच मिळणार आहेत. या वेळी सर्व उपस्थित ग्रामस्थांना, कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांनां जिलेबी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमस विजय भोगटे, सुरेश सावंत, बाबू सावंत, प्रफुल काणेकर, पंचक्रोशितील गावांचे सरपंच उपसरपंच भाजप पदाधिकारी ,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!