*कोकण Express*
*आम. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त असलदे वृध्दाश्रमाला धान्य वाटप*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पक्षाचे कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त असलदे येथील वृध्दाश्रमाला नांदगाव भाजपाच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुका सरचिटणीस व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, असलदे सोसायटी चेअरमन प्रकाश परब, उपसरपंच संतोष परब, भाजपचे नांदगाव शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, बुथ अध्यक्ष कमलेश पाटील, अवधुत गगनग्रास तसेच असलदे वृध्दाश्रमालाच्या संचालिका दिपिका रांबाडे आदी उपस्थित होते.