*▪️कोकण एक्सप्रेस वेबसाईटचा दसऱ्याच्या मुहूर्तावर शुभारंभ*
*▪️एका क्लिकवर वाचता येणार कोकण एक्सप्रेस च्या बातम्या*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलद गतीने आपल्या न्यूज चॅनेलची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने वेब न्यूज पोर्टल www.konkanexpress.in च दसऱ्याचे औचित्य साधून श्री. महादेव माळकर सर (eBusiness Services : Android, Website and Custom Software Development), सावंतवाडी यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला.
अवघ्या काही महिन्यातच जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात लोकांच्या पसंतीस उतरलेल्या चैनल चे म्हणजेच कोकण एक्सप्रेस आता एका क्लिकवर आपल्या वेबसाईटवर पाहता येणार. प्रिंट मीडिया बरोबरच आता एका क्लिकवर क्षणाक्षणाची माहिती उपलब्ध होते त्यामुळे लोकांचे सोशल मीडिया कडे आकर्षण झाले आहे. म्हणूनच कोकण एक्सप्रेसने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे वाचकांच्या हृदयात आणि मनात एक अतूट नात्यांचे स्थान निर्माण केले आहे. कोकण एक्सप्रेस समाजातील प्रत्येक घटकाच्या घडामोडी, कला, साहित्य, खेळ, क्रीडा, शिक्षण, राजकारण आणि सामाजिक माहिती बातम्यांच्या माध्यमातून सादर करत राहणार आहोत .