*कोकण Express*
*आम. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त नांदगावात सलून व्यावसायीकांना धान्य वाटप*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पक्षाचे कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगावातील सलून व्यावसायीकांना नांदगाव भाजपा शाखेतर्फे धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुका सरचिटणीस व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, भाजपचे नांदगाव शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये,बुथ अध्यक्ष कमलेश पाटील, अवधुत गगनग्रास तसेच नांदगाव परिसरातील सलून व्यावसायीक उपस्थित होते.
