आम. वैभव नाईक तर गडग्यावरून उडी मारुन पळाले होते – शिशिर परूळेकर

आम. वैभव नाईक तर गडग्यावरून उडी मारुन पळाले होते – शिशिर परूळेकर

*कोकण Express*

*आम. वैभव नाईक तर गडग्यावरून उडी मारुन पळाले होते – शिशिर परूळेकर*

*…तर सुशांत नाईक तोंडात बोटे घालतील!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आमदार वैभव नाईक आतापर्यंत राजकारणात किती वेळा पळाले, ते जर सुशांत नाईक यांना समजले तर ते आपल्या तोंडात बोटे घालतील. वैभव नाईक अनेकदा पळाले तेव्हा सुशांत नाईक हे वयाने खूप लहान होते. श्रीधर नाईक चौकात त्या वेळी राणे समर्थकांनी संदेश पारकर यांना मारहाण केली होती, त्यावेळी आता आमदार असलेले वैभव नाईक हे कणकवली कोर्टाच्या गडग्या वरून उडी मारुन पळाले होते. हा प्रकार कणकवलीतील जनतेला माहिती आहे. जर सुशांत नाईक यांना वैभव नाईक यांचे पाळण्याचे प्रकार माहिती करून घ्यायचे असतील तर त्याने समीर नलावडे यांना खाजगीत येऊन भेटावे. सत्तेच्या धुंदीत असलेल्या शिवसेनेकडून सध्या सुरू असलेली दादागिरीची सत्ता गेल्यावर निश्चितच परतफेड केली जाईल. पळून जाण्याच्या घटनांचा वैभव नाईक यांना भरपूर मोठा इतिहास आहे. त्याची अगोदर माहिती सुशांत नाईक यांनी घ्यावी. असा टोला नगरसेवक शिशिर परूळेकर यांनी सुशांत नाईक यांना लगावला आहे.

परूळेकर पुढे म्हणाले, कणकवली नगराध्यक्ष यांची पात्रता काय आहे ते मागच्या नगराध्यक्ष निवडणुकीत आमदार वैभव नाईक व संदेश पारकर यांना दाखवून दिले आहे. पक्ष असतानादेखील अपक्ष उपनगराध्यक्ष झालेल्यांना पक्षनिष्ठा काय कळणार. कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीत जंग जंग पछाडूनही वैभव नाईक व संदेश पारकर यांचे नाकी नऊ आले. कणकवली शहरात अनधिकृत बांधकामाचा बादशाह अशी ओळख असलेल्या सुशांत नाईक यांना समीर नलावडे नगराध्यक्ष झाल्यापासून अनधिकृत बांधकामे करायला मिळत नाहीत त्या नैराश्येतून असे आरोप करत आहेत. सुशांत नाईक यांची कुडाळ मधील चायनाटाउन समोरील बिल्डींग किती अधिकृत आहेत त्याची आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यास माहितीच्या अधिकारातून ते कागद जनते समोर आणले जातील. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची गाडी कनेडीत अडवली होती. व त्यांना बांगड्यांचा अहेर देखील दिला होता. गोट्या सावंतामुळेच उद्धव ठाकरे यांना दौरा अर्धवट टाकून माघारी फिरावे लागले होते. याची माहिती सुशांत नाईक यांनी ते असलेल्या पक्षाच्या जुन्या नेत्यांकडून घ्यावी. वैभव नाइक वेंगुर्ला राड्याचा नंतर विलास गावडे यांना भेटण्यासाठी रात्रीच्या काळोखातून गेले होते. आमने सामने ची भाषा करणाऱ्या नाईक यांनी राणेंच्या कार्यकर्त्यांना घाबरून दिवसा फिरण्याची हिम्मत केली नाही. नुकतेच काही दिवसांपूर्वी जानवली मध्ये स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कानाखाली आमदार वैभव नाईक यांनी लगावले होते. त्याचा जाब देखील पारकर गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांना विचारला होता. त्यामुळे त्यांची पक्षात पत काय हे दिसून आले. आमदार नितेश राणे हे मातोश्री ला आव्हान देतात. त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना नाईक बंधूनी विचार करून बोलावे. जिल्ह्यात कोणतीही घटना घडली आमदार वैभव नाईक कोल्हापूर ला लपून बसतात. हे जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. समीर नलावडे गोट्या सावंत यांना सात वर्षाची झालेली शिक्षाही पक्ष संघटना व पक्षांच्या नेत्यांसाठी घेतलेल्या केस मुळे झाली. उद्धव ठाकरें साठी वैभव नाईक व सुशांत आतापर्यंत किती केस घेतल्या. उदय सामंत हे सर्वांची चांगले संबंध ठेवून असतात. त्यांचे गुण आमदार वैभव नाईक यांनी घ्यावेत. अशी टिका नगरसेवक शिशिर परूळेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!