कणकवली तालुक्यातील पत्रकारांना मास्क,सॅनिटायजरचे वाटप
सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकाराने कन्नड तालुक्यातील पत्रकाराना मास्क, सॅनिटायजरचे वाटप शनिवारी करण्यात आले. करोना संकट काळात पत्रकारांच्या संरक्षणासाठी हातभार लावण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे , ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर, संतोष वायगंणकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, महेश सरनाईक, लक्ष्मीकांत भावे, चंद्रशेखर देसाई, संतोष राऊळ, अजित सावंत, दिलीप हिंदळेकर, ओंकार ढवण, उमेश परब, संजय पेटकर, सुधीर जोशी आदी पत्रकार उपस्थित होते.