तौक्ते वादळात वीजपुरवठा सुरळीत ठेवणाऱ्या विजतंत्रि कामगारांचा रेनकोट देऊन होणार सत्कार

तौक्ते वादळात वीजपुरवठा सुरळीत ठेवणाऱ्या विजतंत्रि कामगारांचा रेनकोट देऊन होणार सत्कार

*कोकण Express*

*तौक्ते वादळात वीजपुरवठा सुरळीत ठेवणाऱ्या विजतंत्रि कामगारांचा रेनकोट देऊन होणार सत्कार*

*आमदार नितेश राणेंच्या वाढदिनी नगराध्यक्ष नलावडे यांचा उपक्रम*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

तौक्ते वादळात कणकवली शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या विजतंत्रि कामगारांचा आमदार नितेश राणेंच्या वाढदिनी रेनकोट देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. तौक्ते वादळात कणकवली शहरातील वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी शहरात कार्यरत असलेल्या 13 विजतंत्रि कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली होती. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेला सलाम म्हणून 23 जून रोजी शहरात कार्यरत असणाऱ्या सर्व विजतंत्रि कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष दालनात रेनकोट देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!