*कोकण Express*
*अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकाला अटक*
*देवगड ः प्रतिनिधी (अनिकेत तर्फे)*
देवगड तालुक्यातील तोरसोळे गावामध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेवून बळजबरी केल्याप्रकरणी गावातीलच एका युवकावर देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा प्रकार १७ जून रोजी दुपारी २.३० वा. घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्या गावातील एका युवकाने फूस लावून पळवून नेले व त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी संशयित युवकाविरूध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास महिला पो. उपनिरिक्षक शीतल पाटील करीत आहेत