*कोकण Express*
*समाजासाठी काम करणाऱ्या सक्रिय पत्रकारांना रेनकोट वाटप करणार-संतोष कानडे…*
*आ.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम;कोविड महामारीत निराधार मुलांना आर्थिक मदत करणार…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टीचे कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण मंडलाच्यावतीने कोरोना महामारी सह, विविध सामाजिक प्रश्नांसाठी काम करणाऱ्या पत्रकारांसाठी रेनकोट वाटप करण्यात येणार आहे. कणकवलीत सक्रिय काम पत्रकारांसाठी हा उपक्रम घेण्यात आला आहे. तसेच कोरोना महामारीत ज्यांचे आई वडील मयत झाले,त्या निराधार मुलांना आर्थिक मदत करणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी दिली.
भारतीय जनता ग्रामीण मंडलाच्यावतीने आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आमदार नितेश राणे यांनी समाजासाठी नेहमी काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदर्श निर्माण करण्याचा उपक्रम घेण्यात आल्याचे संतोष कानडे यांनी सांगितले.