*कोकण Express*
*मोदीं सरकार देणार मोफत घरगुती गॅस कनेक्शन*
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या पुढील टप्प्याच्या आराखड्याला अंतिम स्वरुप दिले आहे. काही दिवसातच हा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला मोफत घरगुती एलीपीजी गॅस योजनेचा विस्तार करण्याची घोषणा केली होती. अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, यापुढे एक कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
कुणाला मिळणार लाभ ?
या योजनेमार्फत सरकार दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या कुटुंबांना घरगुती गॅस कनेक्शन देते. हे कनेक्शन कुटुंबातील महिलांच्या नावे देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी या योजनेमुळे अधिक मदत मिळणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रीया :
पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर www.pmujjwalayojana.com याठिकाणी होमपेजवरून फॉर्म ओपन करावा.
त्यानंतर फॉर्मवर नाव, ईमेल आयडी, फोन क्रमांक, कॅप्चा कोड भरावा लागेल. यानंतर ओटीपी जेनरेट करण्यासाठी देण्यात आलेल्या बटणावर क्लिक करा. आधार कार्ड, स्थानिक पत्त्याचं प्रमाणपत्र, तुमचा फोटो इ. कागदपत्र व्हेरिफाय झाल्यानंतर एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात येईल.