*कोकण Express*
*देवगड-निपाणी मार्गावरिल असलदे येथे कार आदळली विद्युत खांबाला*
कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी मार्गावर असलदे शिवाजी नगर येथे ट्रेट्रा कार विद्युत पोलला आदळली यामुळे येथून एकेरी वाहतूक सुरू केली आहे सदर अपघात हा सायंकाळी 5 च्या सुमारास घडला आहे . देवगड निपाणी मार्गावर देवगड ते कोल्हापूर ला जात असताना ट्रेट्रा कार असलदे शिवाजीनगर येथे आली असता चालकाचा ताबा सुटल्याने झाडावरून विद्यूत खांबावर जावून कार धडकली. यात विद्युत पोल व विद्युत तारा ही तुटून पडल्या होत्या तर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.येथे काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती याबाबत माहिती समजताच सरपंच पंढरी वायंगणकर यांनी तात्काळ धाव घेतली आणि लाईट बंद करण्यासाठी सांगितले लाईनमन यासिर मास्के सुनील इंदप तांबोळी यांनी तात्काळ धाव घेतली व विद्युत तारा व पोल हटवून वाहतूक सुरू केली आहे