*कोकण Express*
*प्रशासनाने केलेल्या कामाचं श्रेय लाटण्याचा पालकमंत्र्यांचा केविलवाणा प्रयत्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गात कोरोना नियंत्रणात सत्ताधारी आणि प्रशासनाला अपयश आले आहे.यातच जिल्हा रुग्णालयाची स्थिती अत्यंत दयनिय बनली आहे. ओरोग्य सुविधा, स्टाफ, औषधे योग्य प्रमाणात उपलब्ध नाहीत. याची प्रशासनाने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे, अन्यथा मनसे आपल्या परीने याची दखल घेईल, असा इशारा मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी दिला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढलेला असताना पालकमंत्री केवळ जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचं श्रेय आपण घेऊन आपल्यामुळे काम झाल्याचं श्रेय घेत आहेत असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा कहर माजलेला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्याचा जिल्हाप्रशासन प्रयत्न करत असलं, जिल्हा रुग्णालयातील अनेक शौचालये तुंबून गेली आहेत. मागील काही काळात पेशंटचे हातपाय बांधले जात होते. आॕक्सिजन लेव्हल ३० – ४० पर्यंत आल्यानंतर पेशंटचा आॕक्सिजन काढला जात होता. ज्या पेशंटची स्थिती स्वतःहून जेवन करण्यासारखी नाहीय, नैसर्गिक विधीसाठी जात येत नाहीय, त्या पेशंटच्या नातेवाईकांना त्या रुग्णाच्या सेवेसाठी ठेवलं जात होतं. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका होता. रुग्णालयामध्ये पुरेसा स्टाफ उपलब्ध नसल्याने या समस्या उत्पन्न झाल्या होत्या. यावर आता काही प्रमाणात नियंत्रण आणलं गेलं असलं, तरी अजूनही अशा कित्तेक समस्यांकडे दूर्लक्ष केलं जातंय. पेशंटला जेवन देणाऱ्या महिलेला प्रति ८५ रुपयाने काँन्ट्रक्ट दिले गेले. परंतु कोरोना पेशंटला देण्यात येणाऱ्या जेवनाचा दर १७५ रुपये आहे. त्यामुळे या कमी पैशात राबवून घेणाऱ्या काँन्ट्रक्टरवर कारवाई व्हावी आणि या स्थानिक बचत गटांना जेवनाचं काम देवून त्यांना प्रति ताट १७५ रुपये प्रमाणे काम मिळावं, जेणेकरून त्या उत्तम, सकस आणि पौष्टिक जेवन देवू शकतील, असे उपरकर म्हणाले आहेत. जिल्हा रुग्णालयातील मुदत संपत आलेली औषधं काळाबाजार करून बाहेर विकली जातात. यामागे काही रुग्णालयाशी संबंधित माणसांचा हात आहे. या प्रकरणाविषयी सविस्तर चौकशी व्हावी, अशी मनसेने आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. तसेच पी. एम. केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे अनेक पेशंट दगावले आहेत. जिल्ह्यात अलेल्या फिजिशियननी देखील याविषयी दबक्या आवाजात चर्चा केली होती. परंतु आमदार, खासदार गेल्यानंतर त्यांनी आपली भाषा बदलली. आणि संर्व सुस्थितीत असल्याचं सांगितलं. याचाच अर्थ कुठेतरी गौडबंगाल आहे. त्यामुळे या व्हेंटिलेटरमध्ये काय दोष आहे आणि आरोग्य व्यवस्था कुठे कमी पडतेय, याविषयी चौकशी करण्याची मनसे आरोग्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे, असेही उपरकर म्हणाले. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढलेला असताना पालकमंत्री केवळ जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचं श्रेय आपण घेऊन आपल्यामुळे काम झाल्याचं श्रेय घेत आहेत. परंतु खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या दूर्दशेकडे लक्ष देवून त्यांनी जिल्ह्यासाठी एक चांगला सिव्हिल सर्जन आणण्याची आवश्यकता आहे. डॉ. नागेश पवार यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा आणण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केला पाहिजे होता. परंतु तोही त्यांनी केला नाही. त्यामुळे राज्यकर्ते, पालकमंत्री फक्त प्रशासनाने केलेल्या कामाचं श्रेय घेण्यासाठी आहेत. प्रशासनाच्या कामात नको ती ढवळाढवळ त्यांनी केली नाही, तर प्रशासन योग्य रितीने काम करू शकेल. जिल्ह्यासाठी फिजिशियन उपलब्ध झालेत. परंतु त्यांना याआधीच आणण्याची गरज होती. परंतु मृत्यूचा आकडा हजारीपार करण्याची हे लोकप्रतिनिधी वाट पाहत होते काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मनसे या साऱ्या विषयांवर सातत्याने जनतेची बाजू मांडत आली आहे. बाकी पक्षाचे लोकप्रतिनिधी फक्त कोविड सेंटर, विलगीकरण कक्ष उभारणी करून जातात. परंतु त्यांनी पेशंटला योग्य उपचार मिळवून देण्याकडेही लक्ष द्यायला हवे. गणेशोत्सवासाठी येणारे चाकरमानी नियमांचं पालन करतील, याकडेही योग्य ते लक्ष प्रशासनाने पुरवायला हवं. तसंच त्यांची गावात येण्यापासून अडवणूक करू नये, असे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.