*कोकण Express*
*वेंगुर्ला तालुका काँग्रेस तर्फे राहुल गांधी यांचा वाढदिवस “संकल्प दिन” म्हणून साजरा…*
तालुका काँग्रेसच्या वतीने वेंगुर्ला तहसील कार्यालयाच्या समोर काँग्रेसचे आदरणीय नेते व देशाचे भावी पंतप्रधान खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस *संकल्प दिन* म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारने केलेल्या शेतक-याना देशोधडीला लावणा-या तिनही कृषी कायद्याची होळी करण्यात आली.
यावेळी राहुलजी को लाना देशको बचाना, राहुलजी को लाना किसानको बचना है, राहुलजी को लाना है बेरोजगारी हटाना है, राहुलजी को लाना है मंहगाई घटाना है, नरेंद्र मोदी किसान विरोधी अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, तालुका अध्यक्ष व नगरसेवक विधाता सावंत, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, तालुका सेवादल अध्यक्ष विजय खाडे, तालुका सरचिटणीस उत्तम चव्हाण, शहर अध्यक्ष नगरसेवक व गटनेते प्रकाश डिचोलकर, नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे, नगरसेविका स्नेहल खोबरेकर, एन.एस. यु.आय.तालुका अध्यक्ष शुभम गावडे, अंकुश मलबारी, समीर नागवेकर, सागर नांदोसकर, देवेंद्र सातोसकर, अक्षय डोंगरे इत्यादी उपस्थित होते.