महाराष्ट्रातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख; संदेश पारकर

महाराष्ट्रातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख; संदेश पारकर

*कोकण  Express*

*महाराष्ट्रातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख; संदेश पारकर*

*शिवसेनेचा ५५ वा. वर्धापन दिन कणकवली शिवसेना शाखेत साजरा…!*

*वर्धापन दिनाचे औचित्य साधत उपजिल्हारुग्णालयाला आरोग्य विषयक वस्तू प्रदान….!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. गेल्या साडेपाच दशकांमध्ये शिवसेनेने एक आक्रमक प्रादेशिक पक्ष म्हणून राजकारणात ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. आता राज्यात मुख्यमंत्री स्वतःहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असल्यामुळे पक्षाला एक वेगळे स्थान मिळाले आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणारी संघटना म्हणुन शिवसेनेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज या ५५ व्या वर्धापन दिवसानिमित्त सर्व शिवसैनिकांना भगव्या शुभेच्छा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिल्या.

प्रथमतः कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना पक्ष प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस शिवसेना नेते संदेश पारकर व तालुका प्रमुख शैलेश भोगले यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

यावेळी शिवसैनिकांनी घोषणा बाजी करत तसेच जिलेबी वाटप करत आनंदोत्सव साजरा केला. तसेच उपजिल्हा रुग्णालयाला पीपीई किट, ऑक्सिजन मास्क, N95 मास्क तसेच सॅनिटायझर आदी आरोग्य विषयक वस्तू डॉ.टाक यांच्याकडे सुपूर्त केल्या.

याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुका प्रमुख शैलेश भोगले ,नगरसेवक सुशांत नाईक,ऍड.हर्षद गावडे,राजू राठोड,शेखर राणे,राजू राणे,रुपेश आमडोस्कर,रामू विखाळे, दामू सावंत,विलास गुडेकर,तेजस राणे, आजगावकर, वैद्यही गुडेकर, धनश्री मेस्त्री, संजय पारकर, बाळू पारकर, अमेय पारकर, राजन म्हाडगूत, ललित घाडीगांवकर, प्रतिक रासम, विश्राम सावंत आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. कोरोना प्रदूर्भावामुळे दरवर्षी थाटात केला जाणारा शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साधे पणाने व सामाजिक उपक्रमांनी कोरोनाचे नियम पाळत साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!