कुडाळ तालुका मनसेची सामाजिक बांधिलकी

कुडाळ तालुका मनसेची सामाजिक बांधिलकी

*कोकण Express*

*कुडाळ तालुका मनसेची सामाजिक बांधिलकी…*

*पणदूर,आवळेगाव,कडावल व पांग्रड ग्रामपंचायतींच्या कोविड आयोसोलेशन केंद्रासाठी मनसेकडून अत्याधुनिक स्टीमर मशीन्सचे वाटप…*

*कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचा पुढाकार*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

आज दिनांक 18 जून 2021 रोजी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील पणदूर,आवळेगाव,कडावल व पांग्रड
ग्रामपंचायतींमार्फत उभारण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्रांतील कोविड रुग्णांना वाफ घेण्यासाठी अत्याधुनिक स्टीमर मशिन्स( नेब्युलायझर) ग्रामपंचायत व्यवस्थापनाकडे भेट देण्यात आल्या.यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,सचिव राजेश टंगसाळी,कुडाळ विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष गुरू मर्गज,उपतालुकाध्यक्ष बाळकृष्ण ठाकूर व अविनाश अणावकर, सामाजिक कार्यकर्ते शेखर गोसावी,अमोल जंगले आदी उपस्थित होते.याआधी देखील मनसेकडून पक्षाध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिनी डिगस,वेताळ बांबर्डे, अणाव,वाडीहुमरमळा या ग्रामपंचायतींना स्टीमर मशिन्स भेट दिल्या आहेत.मनसेच्या या उपक्रमाचे ग्रामपातळीवरील सनियंत्रण समित्यांनी स्वागत करून आभार व्यक्त केले आहेत.यावेळी पणदूर परिसरातील कोरोना कालावधीत 28 कोविड रुग्ण व 2 मृतदेह आपल्या ताब्यातील एम्बुलन्सद्वारे मोफत वाहतूक करून त्यांच्या कुटुंबियांसाठी देवदूत ठरलेल्या पोलीस पाटील श्री.देऊ सावंत यांचा मनसेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!