सावंतवाडी मळेवाड महामार्गावरील गटार खोदाईला सुरुवात

सावंतवाडी मळेवाड महामार्गावरील गटार खोदाईला सुरुवात

*कोकण  Express*

*सावंतवाडी मळेवाड महामार्गावरील गटार खोदाईला सुरुवात*

*सरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला यश*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सरपंच हेमंत मराठे यांनी चिखल व गढूळ पाणी भेट देण्याच्या इशाऱ्यानंतर गटार खोदाई कामाला अखेर सुरुवात करण्यात आली.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी गटार खोदाई कामे करणे गरजेचे असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाक्या अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणा व कंत्राटदारांकडे कामे करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने गटार खोदाई कामे अनेक ठिकाणी रखडलेली दिसून येत आहेत. सावंतवाडी मळेवाड मार्गावरील अनेक ठिकाणी गटारे खोदाई न केल्याने ठीक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर साचून त्याचा त्रास वाहनधारक व पादचारी यांना होत आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यावर माती वाहून आल्याने अपघातास कारणीभूत ठरत होती. यामुळे गटार खोदाई व रस्त्यावरील माती बाजूला करण्याची मागणी मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती व माती बाजूला न केल्यास चिखल व गढूळ पाण्याची भेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर सावंतवाडी मळेवाड मार्गावरील गटार नसल्याने पाणी साच्ट असलेल्या ठिकाणी गटार खोदाई व रस्त्यावर पडलेली माती बाजूला करण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने करण्यास सुरुवात करण्यात आले आहे. याबद्दल वाहन धारक, पादचारी व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात असून सरपंच मराठे यांनी सार्वजनिक बांधकाम चे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!