*कोकण Express*
*९ रूग्णवाहीकांवरील वाहन चालकांना सुरक्षा कवच देणार…!*
*पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या पुढाकाराने हा अनोखा उपक्रम…!*
*कणकवली ः (संंजना हळदिवे)*
आम.नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या पुढाकाराने कणकवली तालूक्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्रातील व उपजिल्हा रूग्णालयातील 2 असे एकूण 9 रूग्णवाहीकांवरील सर्व वाहन चालकांना सुरक्षा कवच म्हणून कोरोना काळात विमा संरक्षण देण्यात आले आहे. हे विमा संरक्षण सभापती मनोज रावराणे यांनी स्वखर्चाने केलेले असून त्यामुळे कणकवली तालूक्यातील 9 वाहन चालकांना यांचा लाभ मिळणार आहे.
23 जून रोजी या विमाकवचाचे वितरण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासनाने कोरोनामध्ये प्राधान्यान काम करणाऱ्यासाठी सुरक्षा कवच म्हणून विमा योजना सुरु करण्याचे आदेश दिले परंतू या कोराणाच्या महामारीमध्ये प्रामुख्याने रुग्णांची जवळून सेवा बजावणाऱ्या रुग्णवाहीकांच्या वाहन चालकांकडे कोणीही लक्ष दिलेले नाही . परंतू प्रथमच जिल्हयात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आम.नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रूग्णवाहीकेवरील वाहन चालक आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा बजावीत असतो आणि हा घटक कुठेतरी दुलक्षीत राहू नये व त्यांना भविष्यामध्ये विमा योजनेचा त्याला आधार असावा याच भावनेने सभापती मनोज रावराणे यांनी हा विमा काढलेला आहे. या विम्याचे वितरण आम.नितेश राणे यांच्या 23 जून 2021 रोजी वाढदिवसाचे औचीत्य साधून संबंधित वाहन चालक यांना वितरीत करणेत येणार आहेत. हे विमा कवच दिल्याने कोरोना काळात काम करण्यासाठी या वाहन चालकांना प्रोत्साहन मिळणार आहे. अशी माहीती सभापती मनोज रावराणे यांनी दिली.