*कोकण Express*
*कणकवलीतील ‘त्या’ प्रभाग मधे आरटीपीसीआर टेस्टला सुरूवात!*
*नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील 17 पैकी 8 प्रभागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातपेक्षा अधिक आहे. या ठिकाणी प्राधान्याने टेस्टिंग सुरू करण्याचा निर्णय काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार आज पटवर्धन चौक, महापुरुष परिसर ते आंबेआळी कामत दुकान पर्यंतच्या प्रभागातील व्यापारी व नागरिकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी न.पं. व आरोग्य विभागाच्या वतीने वळंजू कॉम्प्लेक्स येथे टेस्टिंग केंद्र सुरू करण्यात आले आहे.
यामध्ये न.पं.कर्मचारी व आरोग्य विभागातील कर्मचारी कार्यरत आहे. जास्ती जास्त नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी ही टेस्ट करून कोरोनाला हद्दपार करण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.