*कोकण Express*
*फोंडा पेट्रोल पंपासमोर खड्यांचं साम्राज्य*
*अपघात होण्याची वाट बघू नका त्या आधीच खड्डे बुजवा नागरिकांची मागणी*
*फोंडाघाट ः (अनिकेत तर्फे)*
देवगड- निपाणी रोड वर फोंडया जवळील भारत पेट्रोल पंपाच्या समोर असंख्य खड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. गेले ४ दिवस कणकवली मध्ये मुसळदार पाऊस पडत आहे,त्या पावसाच्या पाण्याने खड्डे दिसायचे बंध झाले आहेत. त्या मुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
रस्त्यावरील खड्डे हे पावसाळ्यातले नसून त्या आधी पासूनचे आहेत पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हे खड्डे का बुजवले नाहीत? प्रशासन अपघात होण्याची वाट बगत आहे का? दर वर्षी या ठिकाणी खड्डे पडतात प्रशासन यावर काहीच उपाय योजना करत नाही .
मोटरसायकल चालकांना हे खड्डे अपघाताचे कारण ठरू शकत.पंपावर ये -जा करणाऱ्या मोठया वाहनांनी हे खड्डे पडले आहेत असं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे. खड्डे लवकरात लवकर बुजवा नाहीतर होण्याऱ्या अपघातांना प्रशासन जबाबदार राहील असा मत नागरिक व्यक्त करत आहेत.