*कोकण Express*
*तळेरे ते वैभववाडी मार्गावरील धोकादायक कमान हटवा*
*कणकवली ः (संंजना हळदिवे)*
कणकवली पोलीस स्टेशन ते कलमठ कुशे दुकान या सार्व.बांधकाम कणकवली अखत्यारीत रस्त्यावरील गटार साफ करण्यात यावे तसेच झाडी मारण्यात यावी अशी सुचना महेश लाड यांनी मांडली . शिक्षण संचालक पुणे यांचे कडून ऑनलाईन अध्यापनाच्या सुचना प्राप्त झाल्या असून तालुक्यात ऑनलाईन शिक्षण चालू झाले असल्याचे शिक्षणविभागाकडून सांगण्यात आले . तळेरे ते वैभववाडी या मार्गावरील कमान धोकादायक असल्याने त्वरीत हटविण्यात यावी अशी सुचना दिलीप तळेकर यांनी मांडली पंचायत समिती कणकवलीची मासिक सर्वसाधारण सभा शासनाचे निर्देशानुसार झुम अॅप व्दारे ऑनलाईन सभाध्यक्ष तथा सभापती मनोज रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . या सभेला पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पारकर , तसेच सदस्य तसेच खातेप्रमुख अधिकारी / कर्मचारी यांनी भाग घेवून सक्रिय सहभाग नोंदविला . कणकवली प.स.माजी उपसभापती सुभाष सावंत, सातरल माजी उपसरपंच नयन राणे , लघुपाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त शाखा अभियंता कृष्णाजी आबाजी पाटील , करुळ कोंडये ग्रामसेवक आतिश बर्वे यांचे निधन झाल्याने त्यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात यावी असा ठराव सभाध्यक्ष तथा सभापती मनोज रावराणे जाहीर केला . त्यांना सभागृहात श्रध्दाजंली वाहण्यात आली. ग्रामपंचायतीचा वार्षिक प्रशासन अहवाल चालूवर्षीही प्रतिवर्षाप्रमाणे जिल्हात प्रथम करण्यात आला असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सिंधुदुर्ग यांचेकडून अभिनंदन करण्यात आले आहे. आम.नितेश राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जम्बो सिलेंडर उपलब्ध केल्याने घरोघरी ऑक्सीजन गरजू लोकांना उपलब्ध होणार आहे तसेच उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सीजन फलोमीटर व ऑक्सीजन कनेक्टर उपलब्ध केल्याने रुग्णालयातील ऑक्सीजनची बेडसंख्या वाढ झाली या कार्यासाठी अभिनंदनाचा ठराव मिलींद मेस्त्री यांनी मांडला . सर्व पंचायत समिती सदस्य तसेच खातेप्रमुख यांनी सभेला उपस्थीत राहून सहकार्य केल्याने त्यांचे आभार मानून सभा संपल्याचे सभापती यांनी जाहिर केले .