*कोकण Express*
*महामार्गावरील जानवली येथील अपघातात तरूण ठार…*
मुंबई गोवा महामार्गावरील जानवली येथे झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरूण ठार झाला. रोहित रूपेश कपाले (वय २५, रा.कासार्डे, जांभुळवाडी) असे त्याचे नाव आहे. महामार्गावर अचानक गुरे आडवी आली. या गुरांना धडकून रोहित महामार्गृावर आदळला. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
कणकवलीच्या दिशेने येणार्या रूग्णवाहिका चालकाला रस्त्यालगत कोसळलेला तरूण आढळला होता. जखमी अवस्थेतील रोहित कपाले याला रूग्णवाहिका चालक गुरूनाथ मेस्त्री (रा.शिरवल) याने येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिस तपासामध्ये हा तरूण कासार्डे येथील असल्याचे निष्पन्न झाले.