*कोकण Express*
*मळेवाड मार्गावरील गटार खोदाई चार दिवसांत करा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येत्या चार दिवसात सावंतवाडी मळेवाड मार्गावरील गटार खोदाई करा अन्यथा अधिकाऱ्यांना रस्त्यावरील गढूळ पाणी आणि चिखलाची भेट देणार असल्याचा इशारा मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग कडून गटार खोदायची कामे पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यास दिरंगाई झाल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी गटार पूर्णपणे बंद करून जाण्या-येण्यासाठी रस्ता तयार केला आहे. यामुळे गटारातील पाणी रस्त्यावर साचत आह घोडेमुख येथे रस्त्यावर माती पावसामुळे वाहून आल्याने अपघात होत आहेत. याबाबत प्रणाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली असूनही अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.येत्या चार दिवसात घोडेमुख रस्त्यावरील पडलेली माती व सावंतवाडी मळेवाड मार्गावरील ज्या ज्या ठिकाणी गटार बंद असल्याने पाणी साचत आहे, त्या ठिकाणच्या गटारांची खोदाई सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावरील चिखल आणि गढूळ पाणी भेट म्हणून देणार असल्याचा इशारा मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे.तसेच असलेले गतिरोधक यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रंगरंगोटी करण्याचे कंत्राट दिले होते. मात्र ज्या कंत्राटदाराला हे काम दिले त्याने काही ठिकाणी गतिरोधकाना रंग रंगोटी केलेली नाही. त्या ठिकाणी तात्काल गतिरोधक रंग रंगोटी करावी अशी मागणीही मराठे यांनी केली आहे.