*कोकण Express*
*तालुक्यातील अवैध चालू असलेल्या दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा*
*वैभववाडी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना निवेदन…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्री होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत कुटुंबाचे आर्थिक गणित आधीच बिघडले असताना त्यात मोल मजुरी करुन मिळालेले पैसे काही व्यक्ती दारुवर खर्च करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात अनेकांचे संसार धोक्यात येऊन कौटुंबिक हिंसाचारात वाढ होण्याची शक्यता आहे. तरी संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी या मागणीचे निवेदन वैभववाडी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना देण्यात आले आहे.
यावेळी जि.प. माजी महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, पं. स. वैभववाडी माजी सभापती शुभांगी पवार, भाजपा महिला पदाधिकारी प्राची तावडे, विद्या पाटील, वैशाली काळे, शुभांगी बोडेकर, लक्ष्मी बोडेकर आदी उपस्थित होते.