मनसेकडून  कसाल ग्रामपंचायतीला आरोग्याचे साहित्य वााटप

मनसेकडून  कसाल ग्रामपंचायतीला आरोग्याचे साहित्य वााटप

*कोकण  Express*

*मनसेकडून  कसाल ग्रामपंचायतीला आरोग्याचे साहित्य वााटप*

*मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष *श्री. गणेश कदम यांच्या वतीने रोख १०,०००/- मदत…*

*कसाल ःःप्रतिनिधी* 

कसाल ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनानुसार आज मनसे नेते मातोश्री ट्रस्टचे अध्यक्ष *मनोजजी चव्हाण* यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने *मा. राजसाहेबांच्या वाढदिवसाचे* औचित्य साधून कोविड उपचारासाठी लागणारी औषधे, पीपीई किट, फेस मास्क, फेस शिल्ड व सॅनिटायझेर वस्तू प्रदान केल्या व मनसेच्या लॉटरी सेनेचे अध्यक्ष *श्री. गणेश कदम यांच्या वतीने रोख १०,०००/- राघोजी कदम यांच्या हस्ते* कसाल ग्रामपंचायतचे , ग्रामविकास अधिकारी शालिनी कोकरे, उपसरपंच दत्ताराम सावंत, राजाराम पवार यांच्या जवळ सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष श्री. धीरज परब,अवधूत मालणकर, यशवंत परब सर, प्रकाश नारकर सर, बाळा कांदळकर, गणेश वाईरकर, मनसे शाखा अध्यक्ष अनिल कसालकर, मंगेश कसालकर, नीतेश लाड, सुशांत कसालकर, पृथ्वीराज येरूणकर, आदिल शहा, संदीप परब व गावातील मान्यवर हजर होते. कोरोना महामारीच्या काळात तातडीने मनसे मार्फत मदत पोहचल्या मुळे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असलेले मनसेच्या गणेश कदम यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. *यावेळी ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी माननीय राज साहेब ठाकरे, श्री. मनोजजी चव्हाण, श्री. गणेश कदम, धिरज परब व राघोजी कदम यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!