व्यापाऱ्यांवर आली आत्महत्या करण्याची पाळी ; ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न व्हावेत

व्यापाऱ्यांवर आली आत्महत्या करण्याची पाळी ; ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न व्हावेत

*कोकण  Express*

*व्यापाऱ्यांवर आली आत्महत्या करण्याची पाळी ; ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न व्हावेत..*

*सावंतवाडी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी पत्राद्वारे केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी..*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

कोरोना विषाणूने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कहर माजविला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न व्हावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सावंतवाडी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

पत्रात मांजरेकर यांनी म्हटले की, एकीकडे मुंबईसारख्या महानगरात भरपूर डॉक्टर असल्यामुळे तेथील आकडा कमी झाला आहे. तोच फाॅम्युला सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवून येथे तज्ञ डॉक्टरांची टीम पाठवून सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे. , सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. पुन्हा-पुन्हा लाॅकडाऊन वाढवण्यात आल्यामुळे येथील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. हॉटेल व्यवसाय पूर्ण ठप्प झाला आहे. पार्सल सुविधा याठिकाणी चालणारे नाही, त्यामुळे कामगारांचे पगार देणे शक्य नाही. अन्य व्यावसायिक सुद्धा अडचण आले आहेत. लाईट बिल, बँकेचे हप्ते, अन्य व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्याबाबत तात्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी मागणी मांजरेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!