*कोकण Express*
*कणकवलीत अत्यावश्यक वगळता इतर दुकाने बंद*
*नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाची कारवाई*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहर आणि तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावयाच्या पाश्वभूमिवर शहरातील बाजारपेठेतील अत्यावश्यक व्यतिरिक्त चालू असलेली विविध दुकाने पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत कडून आज बंद करण्यात आली. दरम्यान, पोलीस निरीक्षक अजरुद्दीन मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौथ्या चरणातील प्राप्त शासन अध्यादेशानुसार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या नियमांनुसार अत्यावश्यक सेवे वेतिरिक्त जी दुकाने चालू होती ती बंद करण्यात येत आहेत. अशी माहीती त्यांनी दिली. पोलीस निरीक्षक अजीरुद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शना खाली पी आय सूरज पाटील, स. उप. फौ. विनायक चव्हाण, पो. हवालदार जाधव, वाहतूक पोलीस माने, न. पं. कर्मचारी रविंद्र महाड़ेश्वर, संतोष माने आदींनी ही कारवाई केली.