*कोकण Express*
*पुन्हा पाणी साचून नुकसान झल्यास न.पं.प्रशासनाला जबाबदार धरणार – रुपेश नार्वेकर*
*न.पं. चा अनागोंदी कारभार ; तीन वर्षानंतर आता तरी जाग येणार का?*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायत म्हणजे ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था सुरू असून गेले तीन वर्षे ही नगरपंचायत रामेश्वर प्लाझा परिसरातील पाणी तुंबण्याचा प्रश्न निकाली काढू शकली नाही.फक्त पाहणी करून फोटो सेशन करण्या पलीकडे सत्ताधार्यांनी काही केलेले नाही.यामुळेच येथील नागरिकांना कालची रात्र भयभीत होवून काढावी लागली यामुळे एकंदरीतच गाळे धारकांना केवळ मानसिक त्रास देण्याचे काम नगरपंचायत करत असल्याचा आरोप नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी केला आहे.
कणकवली येथील महा मार्गालगत असलेल्या आणि बँकेसारखी कार्यलये ज्या संकुलनात आहेत.अशा ठिकाणी गेले तीन वर्षे सातत्याने न.पं. च्या हलगर्जीपणामुळे पाणी तुंबण्याचा प्रकार वारंवार घडत असताना नगरपंचायत नेमके काय काम करते हा संशोधनाचा विषय झाला आहे.
गतवर्षी या संकुलनातील नागरिकांच्या गाळ्यामध्ये पाणी भरतानाच अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले होते.त्यातुन काही धडा न घेता.नगरपंचायत सत्ताधार्यांचा फोटो सेशनचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे.
आपत्कालीचा टेंबा मिरवणारी आपत्कालीन व्यवस्था आपत्तीच्या वेळीच गायब कशी होते.असा सवाल करताना रुपेश नार्वेकर म्हणाले, या सर्व अनागोंदी कारभाराला कणकवली नगरपंचायतीचे सत्ताधारी जबाबदार असून या ठिकाणच्या नागरिकांचे व गाळे धारकांचे काही नुकसान झाल्यास याला नगरपंचायत प्रशासन जबाबदार असणार यांची नोंद मुख्याधिकारी यांच्या जवळ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.