*कोकण Express*
*कणकवली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी पाणी तुंबलेल्या ‘त्या’ ठिकाणी दिली भेट!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील रामेश्वर प्लाझा इमारतीच्या परिसरात पाणी साचले होते. त्याची पाहणी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केली. तसेच महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अधिकारी सलीम शेख यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा करत ‘त्या’ नाल्यातुन पाण्याचा विसर्ग होत नसल्याची माहिती देत, सदर ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने माहिती दिली.
नगरपंचायतच्यावतीने हॉटेल गोकुलधाम येथे अडकलेल्या सेन्ट्रीगच्या फळ्या हटवत ‘त्या’ ठिकाणची पाहणी करण्यात केली. याचबरोबर ज्या समस्या कणकवली शहरात आहेत, त्या संदर्भात महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार यांनी तातडीने कारवाई करत सदर प्रश्न निकाली लावण्याची मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सलीम शेख यांच्याकडे केली आहे. यावेळी गटनेते संजय कामतेकर,अजय गांगण व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.