सततच्या पडणाऱ्या पावसाचा रामेश्वरप्लाझा इमारतीला फटका

सततच्या पडणाऱ्या पावसाचा रामेश्वरप्लाझा इमारतीला फटका

*कोकण  Express*

*सततच्या पडणाऱ्या पावसाचा रामेश्वरप्लाझा इमारतीला फटका…!*

सलग तिसऱ्या वर्षी भरले रामेश्वरप्लाझा इमारतीत पाणी…!

लगतच्या मोरीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने भरते पाणी..!

नाले सुस्थितीत करण्याची रहिवाशांची मागणी…!

*कणकवली ःप्रतिनिधी*

कणकवली तालुक्यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे. महामार्गालगत असलेल्या रामेश्वर प्लाझा या इमारतीच्या तळमजल्यावर आज पहाटे चारच्या सुमारास पाणी साचले होते. इमारती लगत असलेल्या ओढ्यातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात झाल्याने वाढलेले पाणी इमारतीच्या तळमजल्यावर भरल्याने रहिवाशांची एकच तारंबळ उडाली. तर महामार्ग ठेकेदाराच्या पद्धतीच्या फटका सलग तिसऱ्या वर्षी या रहिवाशांना बसला.

रामेश्वर प्लाझा इमारतीच्या समोरच्या बाजूला हॉटेल गोकुळधाम लगत नाल्यातून होणारा पाण्याचा निचरा हा योग्य पद्धतीने होण्यासाठी ठेकेदार कंपनीने उपाययोजना न केल्याने त्याचा फटका येथील रहिवाशांना बसत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पहाटे साचलेल्या पाण्याच्या ठिकणी पार्क केलेल्या दुचाकी रहिवाशांनी सुरक्षित स्थळी हलवल्या असून दरवर्षी होणाऱ्या या त्रासाबाबत येथील नागरिक संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या वर्षी व त्या पूर्वी ही अशाच प्रकारे पाणी घुसून इमारतीमधील सारस्वत बँक तसेच इतर गाळे मालकांचे मोठे नुकसान झाले होते.

काही काळानंतर हे साचलेले पाणी ओसरले असून आता तरी याकडे लक्ष देवून हे नाले सुस्थितीत करण्याची मागणी येथील रहिवाशाकडून केली जात आहे. तर दुसरीकडे पावसाचा जोर असाच राहिल्यास मराठा मंडळ येथील के टी बंधाऱ्यावरून व आचरा रोडवर पाणी साचण्याची शक्यता आहे.आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 02367-232025 या नंबरवर संपर्क समसाधण्याचे आवाहन तहसीलदार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!