*कोकण Express*
*सकाळचे बातमी अपडेट / १६ जून बुधवार*
◾ काल आपण खाद्य तेलाच्या किमतीत घट होईल , याबद्दल जाणून घेतले होते – दरम्यान आता खाद्य तेलाच्या दरात घट झाली आहे –
◾ अद्यावत माहितीनुसार खाद्यतेलाचे दर प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी कमी झालेत – तर जागतिक बाजारपेठेतून आवक वाढल्याने किमतीत घट झाली आहे
◾ आता परदेशात जाणाऱ्याना , कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी 84 दिवस नाहीतर , तर केवळ 28 दिवस वाटपहावी लागणार –
◾ मुंबई महापालिकेने काल याबाबतच्या अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी केल्या – तर हि सवलत 31 ऑगस्ट 2021 पर्यंत असणार आहे
◾ राज्यात म्युकरमायकोसिसबाधित मृतांच्या संख्येत महिनाभरात ८३ टक्के वाढ झाली – आतापर्यंत ६४४ जणांचा यामुळे मृत्यू झाला – तर मृत्युदर नऊ टक्क्यांपर्यंत आहे
◾ सलग दुसऱ्या वर्षी शाळा सुरू न झाल्याने , आणि वर्क फ्रॉम होम कल्चर वाढल्यानेही लॅपटॉप सेगमेंटमध्ये मोठी मागणी आहे
◾ मागील काही महिण्यातच लॅपटॉपच्या किमती 5 ते 7 टक्क्यांनी वाढल्या असून , पुढेही महाग होणार आहेत – असे विजय सेल्सचे एमडी निलेश गुप्ता यांनी सांगितले
◾ भारतीय वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा – दोन डोसमधलं अंतर दुप्पट करण्याची , आम्ही शिफारस केलीच नव्हती
◾ काही दिवसापूर्वी आपण सोन्याच्या होलोमार्किंग बद्दल जाणून घेतले होते – दरम्यान आता हॉलमार्किंग नियमांची अंमलबजावणी पुन्हा एकदा लांबणीवर टाकली जाऊ शकते –
◾ कारण केंद्रीय मंत्री पियुष गोयल , याबाबत ज्वेलर्ससोबत चर्चा करणार आहेत – तसे हॉलमार्किंग विषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू