*कोकण Express*
*आंबोली घाटात अज्ञाताची उडी घेऊन आत्महत्या…*
*रेस्क्यू टिमच्या माध्यमातून पोलिसांचे शोधकार्य सुरू*
*आंबोली ः प्रतिनिधी*
आंबोली येथे मुख्य धबधब्या जवळील दरडीच्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची शक्यता तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना दिली असून, तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर रेस्क्यू टीमच्या माध्यमातून पोलिसांचे दरीत शोधकार्य सुरू आहे.