*कोकण Express*
*घोणसरी ग्रा.पं. च्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन सभापती रावराणे यांच्या हस्ते झाले*
*सभापती मनोज रावराणे यांनी स्वखर्चाने दिले 5 बेड*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
घोणसरी ग्रा. पं. च्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या 10 बेडच्या कोव्हीड -19 विलगीकरण कक्षाचे उद्घाटन कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते सरपंच मृणाल मकरंद पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सभापती मनोज रावराणे यांनी स्वखर्चाने ५ बेड या विलगीकरण कक्षासाठी सुपुर्द केले आहेत. यावेळी उपसरपंच विलास मराठे, ग्रामसेवक एस बी गोसावी, आरोग्य सेवक एस आर राठोड, तलाठी लांबर, ग्रा. पं. सदस्य महेश येंडे, सुगंधा सावंत, अनिल राणे, कृष्णा एकावडे, तावडे, भाई राणे, जेरोन बारेत, राजेंद्र चव्हाण, व्हॅलेरियन पिंटो, दीपक राणे आदी उपस्थित होते.