पदोन्नतीच्या आरक्षणप्रश्नी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात

पदोन्नतीच्या आरक्षणप्रश्नी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात

*कोकण Express*

*पदोन्नतीच्या आरक्षणप्रश्नी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात…!*

*छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी संपूर्ण महाराष्ट्रात होणार धरणे आंदोलन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सुप्रीम कोर्टात पदोन्नती आरक्षणाबाबत विशेष अनुमती याचिका प्रलंबित असतानाही महाराष्ट्र शासनाने दिनांक 7 मे, 2021 रोजी अध्यादेश काढून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आरक्षण बंद करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे घटनात्मक अधिकार डावलले आहेत. या अन्यायाविरोधात कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली व आदेशानुसार आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी 26 जून, 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष संदिप कदम यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे आंदोलन कोरोनाचे सर्व नियम पाळून जिल्हाधिकारी कार्यालय येथे छेडण्यात येणार आहे. तसेच विभागीय आयुक्त कोकण विभाग यांना ही निवेदन देणार आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांकडे आपली मागणी व आक्रोश पोहचवणार आहोत तरी सर्वांनी या आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे, अशी विनंती संदिप कदम यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!